‘औरंगाबाद नामांतराची जबाबदारी केंद्राची’

औरंगाबादेत शिवसेनेची स्वाभिमान सभा पार पडली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेत अनेक विषयावर भाष्य केले. औरंगाबाद शहराच्या नामांतरावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, औरंगाबाद नामांतराची जबाबदारी केंद्राची असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, संभाजीनगर हे माझ्या वडिलांनी दिलेले वचन आहे. ते वचन मी विसरलो नसून पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. दीड वर्षापूर्वी […]

‘औरंगाबाद नामांतराची जबाबदारी केंद्राची’

औरंगाबादेत शिवसेनेची स्वाभिमान सभा पार पडली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेत अनेक विषयावर भाष्य केले. औरंगाबाद शहराच्या नामांतरावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, औरंगाबाद नामांतराची जबाबदारी केंद्राची असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, संभाजीनगर हे माझ्या वडिलांनी दिलेले वचन आहे. ते वचन मी विसरलो नसून पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. दीड वर्षापूर्वी विधासभेत हा ठराव मंजूर झाला असून कॅबिनेटमध्ये प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. मात्र औरंगाबादचे नामांतरण करण्याआधी शहर विकसित करणे महत्त्वाचे आहे. औरंगबादचे संभाजीनंगर आता करू शकतो. परंतु, शहरात रस्ते, पाणी नसतील तर शहराचे नामांतरण करून काय अर्थ? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, संभाजीनगरमधील रस्ते मोठ्या प्रमाणात सुधारत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं पर्यटनासाठी जंगलसफारी होत आहे. मेट्रोसाठी प्लॅन बनवण्यास सुरूवात झाली आहे. अशाप्रकारे, शहराची शान वाढवणारी विकास कामे संभाजीनगरात होती, असे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्वाभिमान सभेत दिले आहे.

‘पाणी योजनेचा पाठपुरावा करूच’

पाणी योजनेचा पाठपुरावा करूच, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते म्हणाले, मी प्रामाणिक आहे, पाणीप्रश्नाला सामोरे जातोय, कुठेही फसवेगिरी नाही. सभेला येताना प्रशासकीय अधिकारी भेटले. त्यावेळी माझ्या संभाजीनगरच्या लोकांना पाणी द्या, असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले असल्याचे ठाकेर म्हणाले. दरम्यान, योजनेसाठी पैसे कमी पडू देणार नाही. हातात दांडा घ्या, आणि पाणी योजना राबवा, असे उद्धव ठाके म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number