जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये महावितरणनं वीज कनेक्शन तोडल्यानंतर औरंगाबाद महापालिकेला जाग आली आहे. थकित 12 कोटींपैकी दोन कोटी रुपये भरल्यामुळे तूर्तास पाणीकपातीचं संकट टळलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून औरंगाबाद महापालिकेचं 12 कोटी 82 लाख रुपयांचं वीज बिल थकित होतं. यासंदर्भात महावितरण कंपनीनं पालिकेला दोन नोटीस बजावल्या होत्या. मात्र तरीही पालिकेनं वीज देयक रक्कम भरली नव्हती.
अखेर औरंगाबाद महापालिकेचा पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा महावितरणाकडून खंडीत करण्यात आला. त्यामुळे औरंगाबादकरांवर ‘पाण्याची टंचाई निर्माण झाली. त्यानंतर तातडीने औरंगाबाद पालिकेनं 12 कोटींपैकी फक्त 2 कोटींचं बिल भरलं व तूर्तास औरंगाबाद वासियांवरील पाणीकपातीचं संकट टळलं. मात्र आज (शुक्रवारी) सहा तास उशिरा पाणी पुरवठा होणार आहे.