जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
औरंगाबाद दंगलीला कारणीभूत असलेल्या लच्छू पहेलवानला पोलिसांनी अटक केली आहे. लच्छू पहेलवानने दंगल घडवून आणल्याचा आरोप एमआयएमने केला होता. या प्रकरणात ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
गांधीनगर-मोतीकारंजा भागात नळ कनेक्शन कापण्यावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला. त्यानंतर मध्यरात्री राजाबाजार, शहागंज, जिन्सी, नवाबपुरा, चेलीपुरा परिसरात दंगल पेटली. यात जवळपास 75 दुकाने आणि घरे, 64 वाहने, अशी सव्वादहा कोटींची मालमत्ता भस्मसात झाली. दंगलीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक जोमाने कारवाई करीत आहे.
लच्छू पहेलवान याला अटक केल्याची माहिती समजताच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सिटी चौक ठाण्यासमोर गर्दी केली होती. नेत्यांनी ठाण्यात जाऊन त्याची भेट घेतली. तसेच, कार्यकर्त्यांनी बाहेर गर्दी केल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
कोण आहे हा लच्छू पहेलवान –