जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये होळीच्या उत्सवात अनाथांना सोबत घेऊन होळी आणि रंगपंचमी एकत्रपणे साजरी करण्यात आली. संस्कृती फाऊंडेशनने अनाथ मुलांसोबतच्या होळीचे आयोजन केले होते.
शहरातील अनाथ मुलांना एकत्र करून पुरणपोळी आणि विविध रंग देऊन होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेतील सदस्य महिलांनी मुलांसाठी खास घरून पुरणपोळी तयार करून आणल्या होत्या.
इतकंच नाही तर अनेक सदस्यांनी नैसर्गिक रंग आणि पिचकारी देऊन या मुलांचा आनंद द्विगुणीत केला.