जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबादच्या छावणी परिषदेच्या परिसरात पुरवठा करण्यात येणारं पाणी दूषित असल्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरल्याचं आता स्पष्ट झालंय.
आतापर्यत रुग्णांचा आकड 5 हजाराच्या वर पोहचलाय. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागानं गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर पाण्याचे नमुने घेतले होते.
8 पाण्याच्या नमुन्यांपैकी 7 ठिकाणी दूषित पाणी पुरवठा केल्याचे समोर आलयं. गेल्या चार दिवसांपासून छावणी परिषद आणि महापालिकेनं नेमका काय अहवाल तयार केला हे समोर येऊ शकतलेलं नाहीए, आता या अहवालानंतर संबंधितांची चौकशी करण्याची तयारी छावणी परिषदेच्या प्रशासनाकडून सुरु करण्यात आलीय.