मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंना काळं फासलं

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे याxना काळ फसल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. बाळासाहेब सराटे यांच्या एजन्सीला आरक्षणाच्या सर्व्हेचं काम दिलं म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीच सराटे यांना काळं फासलं आहे. औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृह येथे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आरक्षणासंदर्भात निवेदन स्वीकारण्यासाठी आले होते. त्यावेळी ही घटना घडली. मराठा क्रांती मोर्चाच्या काही […]

मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंना काळं फासलं

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे याxना काळ फसल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. बाळासाहेब सराटे यांच्या एजन्सीला आरक्षणाच्या सर्व्हेचं काम दिलं म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीच सराटे यांना काळं फासलं आहे. औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृह येथे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आरक्षणासंदर्भात निवेदन स्वीकारण्यासाठी आले होते. त्यावेळी ही घटना घडली.

मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी बाळासाहेब सराटे यांच्या तोंडावर शाई फेकून काळं फासलं. पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सराटे हे मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत. त्यांची ‘शिवाजी’ नावाची संस्था असून या संस्थेला मराठा आरक्षणाच्या सर्व्हेचं काम देण्यात आल्याने, त्याला विरोध होत आहे. त्या वादातूनच सराटे यांना काळं फासल्याचं सांगण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number