व्हाट्सअॅप ग्रुपवर मेसेज केल्यामुळे ‘त्या’ व्यक्तीची निघृण हत्या

व्हाट्सअॅप ग्रुपवर विरोधात मेसेज टाकल्यावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूलमध्ये घडला आहे. 15 ते 20 जणांनी मिळून तलवार,चाकू, रॉड आणि लाठीने हल्ला करून एकाची शहराच्या भर चौकात निर्घृण हत्या केली आहे, याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. ही थरारक घटना काल संध्याकाळी हर्सूलमधील फातेमानगर चौकात घडली, मोईन महेमूद पठाण […]

व्हाट्सअॅप ग्रुपवर मेसेज केल्यामुळे ‘त्या’ व्यक्तीची निघृण हत्या

व्हाट्सअॅप ग्रुपवर विरोधात मेसेज टाकल्यावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूलमध्ये घडला आहे.

15 ते 20 जणांनी मिळून तलवार,चाकू, रॉड आणि लाठीने हल्ला करून एकाची शहराच्या भर चौकात निर्घृण हत्या केली आहे, याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.

ही थरारक घटना काल संध्याकाळी हर्सूलमधील फातेमानगर चौकात घडली, मोईन महेमूद पठाण असं मृत तरुणाचं नाव असून तो 35 वर्षांचा होता.

नेमकं प्रकरण काय आहे?

  • मोईन पठाण हा हर्सूल इथे जमीन खरेदी-विक्री व्यवहारात एजंट म्हणून काम करायचे.
  • काही दिवसांपूर्वी मोईन याने एका वॉट्सअप ग्रुपवर टाकलेल्या मेसेजमध्ये काही जणांची कुत्र्याशी तुलना केली होती.
  • हा मेसेज वाचून मारेकऱ्यांपैकी काही जणांनी त्यांना फातेमानगर चौकाकडे बोलावले.
  • त्यानंतर तेथे 15 ते 20 जणांच्या टोळक्याने चोहोबाजूने मोईनला घेरत त्यांच्यावर चाकू,तलवार,लाठ्या आणि रॉडने हल्ला केला.
  • या हल्ल्यात मोईन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले मात्र त्यांच्या मदतीसाठी धावलेल्या इरफान नावाच्या व्यक्तीच्या डोक्यातही रॉड मारण्यात आला.
  • त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी इरफान आणि मोईनला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण त्यापूर्वीच मोईन यांचा मृत्यू झाला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number