वृत्तसंस्था, नवी दिल्ली
लाचखोरी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला राज्य सरकारनं हात दिला आहे.
राज्य सरकार अती महत्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्टा हेलिकॉप्टर्स भाड्यानं घेणार आहे. 31 डिसेंबर 2018 पर्यंत राज्य सरकारनं तसा करारही केला.
हवाई दलाचे माजी प्रमुख एस.पी. त्यागी यांना लाच दिल्याप्रकरणी ही कंपनी वादात अडकलीय. यात त्यागींना अटकही झाली होती. या विमानासाठी राज्य सरकारला तासाला पैसे मोजावे
लागणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 ते 20 व्यक्ती बसू शकतील अशा छोट्या हेलिकॉप्टरसाठी लाखोंचा चुराडा केला जाणार आहे. राज्य सरकारला तासाला दीड लाख ते 4 लाख 60 हजार
रुपये मोजावे लागतील. राज्य सरकारने 22 विमाने आणि 9 हेलिकॉप्टरर्स निवडलेली आहेत.