ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादीला नवा प्रदेशाध्यक्ष?

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्षपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पक्ष संघटनेत कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांची नजर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याचदरम्यान, आता छगन भुजबळांनी ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात यावी अशी मागणी केली आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार […]

ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादीला नवा प्रदेशाध्यक्ष?

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्षपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पक्ष संघटनेत कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांची नजर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याचदरम्यान, आता छगन भुजबळांनी ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात यावी अशी मागणी केली आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक दिल्लीत बुधवारी (दि.२८) झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया येत्या दोन तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्षपदाची निवड होणार आहे. ॲागस्टपर्यंत पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number