महारेराच्या वॉरंट्सवरून पनवेल तहसीलमध्ये शुक्रवारी लिलाव

२७ प्रकरणातील ५.९८ कोटींच्या वसुलीसाठी होणार हा लिलाव रायगड जिल्ह्यातील घर खरेदीदारांना द्यावयाच्या नुकसान भरपाईपोटी महारेराने ७४ प्रकरणात १५ कोटी ११ लाखांचे वॉरंट्स जारी केले होते. यापैकी ५.९८ कोटींच्या २७ प्रकरणातील वसुलीसाठी पनवेल तहसीलदार कार्यालयाने येत्या शुक्रवारी, २० जानेवारी रोजी लिलाव जाहीर केला आहे. हे सर्व लिलाव येत्या शुक्रवारी पनवेलच्या तहसील कार्यालयात होणार आहेत. महारेराने […]

महारेराच्या वॉरंट्सवरून पनवेल तहसीलमध्ये शुक्रवारी लिलाव

२७ प्रकरणातील ५.९८ कोटींच्या वसुलीसाठी होणार हा लिलाव

रायगड जिल्ह्यातील घर खरेदीदारांना द्यावयाच्या नुकसान भरपाईपोटी महारेराने ७४ प्रकरणात १५ कोटी ११ लाखांचे वॉरंट्स जारी केले होते. यापैकी ५.९८ कोटींच्या २७ प्रकरणातील वसुलीसाठी पनवेल तहसीलदार कार्यालयाने येत्या शुक्रवारी, २० जानेवारी रोजी लिलाव जाहीर केला आहे. हे सर्व लिलाव येत्या शुक्रवारी पनवेलच्या तहसील कार्यालयात होणार आहेत. महारेराने जारी केलेल्या वॉरंट्सची व्यवस्थित अंमलबजावणी होऊन, घर खरेदीदारारांना दिलासा मिळावा, यासाठी सुरू केलेल्या पाठपुराव्याचे हे मोठे यश आहे.
महारेराची संनियंत्रण यंत्रणा (मॉनिटरिंग सिस्टीम) सक्षम करण्याचा एक भाग म्हणून महारेराने जारी केलेल्या वॉरंट्सचा आढावा घ्यायला सुरुवात केली. वेळोवेळी जारी केलेल्या या वॉरंट्सची वसुली व्हावी यासाठी सहकार्य करण्याचे स्मरणपत्र राज्यातील १३ जिल्हाधिकारी कार्यालयांना पाठविले होते. त्यात जिल्ह्यातील १५ कोटी ११ लाखांच्या ७४ प्रकरणांचा समावेश होता. त्यातील ५ कोटी ९८ लाखांच्या २७ प्रकरणी पनवेल तहसील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे.
घर खरेदीदारांना संबंधित विकासकांनी( बिल्डरने) वेळेवर ताबा न देणे , प्रकल्प अर्धवट सोडणे, निर्धारित गुणवत्ता न राखणे, इत्यादी स्वरूपाच्या तक्रारी महारेराकडे येतात. घर खरेदीदारांच्या या विविध स्वरूपाच्या तक्रारींवर रितसर सुनावणी होऊन प्रकरणपरत्वे व्याज/नुकसान भरपाई/परतावा हे विहित कालावधीत देण्याचे आदेश संबंधित विकासकांना दिले जातात. विकासकांनी ठरलेल्या कालावधीत रक्कम दिली नाही तर ती वसूल करून देण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असते. तसेच वेळोवेळी सुनावणी घेऊन दिलेल्या आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी महारेरा सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे महरेराने म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number