KDMC Water Cut: कल्याण-डोंबिवलीकरांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेला शहराचा पाणीपुरवठा 12 तास ठप्प; पालिकेकडून पाण्याचा साठा करण्याचे आवाहन

जलशुद्धीकरण केंद्रांवरील तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे पालिका प्रशासनाने शहराचा पाणीपुरवठा सलग 12 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

KDMC Water Cut: कल्याण-डोंबिवलीकरांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेला शहराचा पाणीपुरवठा 12 तास ठप्प; पालिकेकडून पाण्याचा साठा करण्याचे आवाहन

KDMC Water Cut: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात येत्या मंगळवारी, 28 एप्रिल 2026 रोजी पाणीबाणीची स्थिती निर्माण होणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रांवरील तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे पालिका प्रशासनाने शहराचा पाणीपुरवठा सलग 12 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन उन्हाळ्यात ही कपात होणार असल्याने नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी आधीच पाणी साठवून ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

देखभाल आणि दुरुस्तीसाठी पालिकेचा पुढाकार
यादरम्यान, बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांमधील विद्युत व यांत्रिक यंत्रणेची दुरुस्ती केली जाणार आहे. भविष्यातील संभाव्य मोठे तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी ही पूर्व नियोजित देखभाल कामे अत्यंत महत्त्वाची असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या तांत्रिक कामामुळे मंगळवारी सकाळी 8:00 ते रात्री 8:00 पर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहील.

'या' भागांतील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम
या 12 तासांच्या पाणीकपातीचा मोठा फटका कल्याण शहर (पूर्व आणि पश्चिम), डोंबिवली शहर (पूर्व आणि पश्चिम) तसेच कल्याण ग्रामीणमधील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि लगतच्या गावांना बसणार आहे. रात्री 8 वाजता पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला जाणार असला तरी, जलवाहिन्यांमधील हवेचा दाब आणि नियोजित वितरणामुळे बुधवारी सकाळपर्यंत पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Vehicle Fitness Inspection : वाहन फिटनेस चाचणीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश, आता फक्त…

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
पाणीकपातीचा विचार करून नागरिकांनी सोमवारीच आवश्यक तेवढा पाणी साठा करून ठेवावा आणि मंगळवारी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, अशा सूचना केडीएमसी प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जाणार असून, नागरिकांनी या तांत्रिक कामासाठी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number