Bhandara Crime: भंडाऱ्यात संतापजनक घटना! 4 वर्षीय चिमुरडीवर मानसिक विकृत तरुणाकडून अत्याचाराचा प्रयत्न; संतप्त जमावाने…

भंडारात 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या 30 वर्षीय विकृताला जमावाने पकडण्यापूर्वी त्याने स्वतःला जखमी केले.

Bhandara Crime: भंडाऱ्यात संतापजनक घटना! 4 वर्षीय चिमुरडीवर मानसिक विकृत तरुणाकडून अत्याचाराचा प्रयत्न; संतप्त जमावाने…

भंडारा शहरात एका चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर एका 30 वर्षीय विकृत तरुणाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. या दुर्दैवी प्रकारामुळे संपूर्ण भंडारा शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी आरोपीवर उपचार न करता त्याला आमच्या स्वाधीन करा, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा शहरातील एका भागात या 30 वर्षीय विकृत मनोवृत्तीच्या तरुणाने चार वर्षांच्या चिमुकलीला एकटे गाठून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने हा भयानक प्रकार घडत असतानाच स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. नागरिक तात्काळ मुलीच्या मदतीसाठी धावून गेले. आपण पकडले गेलो आहोत आणि नागरिक आपल्याला सोडणार नाहीत हे लक्षात येताच, आरोपीने पकडले जाण्याच्या भीतीने स्वतःलाच गंभीर जखमी करून घेतले.

घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत पीडित चिमुकलीला तात्काळ वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी रुग्णालयात हलवले. दुसरीकडे, स्वतःला दुखापत करून घेतलेल्या आरोपीलाही पोलिसांनी उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.या घटनेची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयात जमलेल्या संतप्त नागरिकांनी आरोपीविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला. “अशा विकृत आरोपीवर रुग्णालयात उपचार करू नका, त्याला थेट आमच्या स्वाधीन करा,” अशी मागणी करत संतप्त जमावाने रात्री उशिरापर्यंत रुग्णालयाच्या आवारात ठिय्या मांडला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number