युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी विधानभवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना घडताक्षणीच पोलीसांच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला.
राजलक्ष्मी या नाशिक येथील युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष आहे. या महिलेने विधानभवनाच्या समोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना घडताच क्षणी पोलिसांनी पुढे येत त्या महिलेला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
विधानभवनात राज्यातील हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज सलग तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे समोर आले आहे. तसेच आजही विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारविरोधात आंदोलन केले.