जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
नागपूरात पोलिसांचा काही धाक राहिलाय का हाच प्रश्न निर्माण होत आहे. कारण नागपुरात खाकीवर हल्ला करण्यात आला.
नागपूरच्या संविधान चौकातच कायद्याचे तीन तेरा वाजल्याचे दिसून आले. हेल्मेट कारवाईदरम्यान पोलिसांना समय मारावार या तथाकथित नेत्याला अडवले.
पण, कारवाई केल्याचा राग मनात ठेवून या समयनं पोलिसांनाच धक्काबुक्की केली. अखेर दोन पोलिसांनी मिळून या मुजोर इसमाला पकडून ठेवले.
त्यातही तो पोलिसांवरच गुंडगिरी करायला लागला. पोलीस वाहतूक शिपायांना त्यांनी धक्काबुक्की केली. एवढंच नाही तर त्यांच्यावर हातही उगारला.
पोलिसांना बघून घेण्याची धमकीही दिली. खाकीवरच्या या हल्ल्याने नागपुरात पोलिसांचा कसलाही धाक नसल्याचंच समोर येत आहे.