महावितरण पथकावर नाशिकमध्ये हल्ला

नाशिक शहरात सध्या वीज थकबाकी वसूली मोहीम महावितरणच्या माध्यमातून केली जात आहे. त्यासाठी एक पथकही तैनात करण्यात आले आहे. त्यानुसार, सध्या नाशिक शहरातील भारत नगर येथे थकबाकी वसूली सुरू असतांना अचानक एका ग्राहकाने पथकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कर्मचारी वैभव कांडेकर यांच्यावर हल्ला झाला असून ते किरकोळ जखमी झाले […]

महावितरण पथकावर नाशिकमध्ये हल्ला

नाशिक शहरात सध्या वीज थकबाकी वसूली मोहीम महावितरणच्या माध्यमातून केली जात आहे. त्यासाठी एक पथकही तैनात करण्यात आले आहे. त्यानुसार, सध्या नाशिक शहरातील भारत नगर येथे थकबाकी वसूली सुरू असतांना अचानक एका ग्राहकाने पथकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कर्मचारी वैभव कांडेकर यांच्यावर हल्ला झाला असून ते किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत त्यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास केला जात आहे. दरम्यान या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यावरून महावितरण विभागात नाराजी व्यक्त केली जात आहे.

मार्च अखेरीस सर्व थकीत वीजबिल वसूलीची मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामध्ये ज्यांनी वीजबिल थकविले आहे. त्या ग्राहकांकडून वीज बिल वसूली केली जात आहे. त्यासाठी महावितरण कडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. वसुलीचे पथकच सध्या थकीत ग्राहकांकडे जावून वीज बिल वसूल करीत आहे. जे ग्राहक थकीत वीजबिलाचा भरणा करत नाही त्या ग्राहकांना महावितरण कडून विनंती केली जात आहे. ज्यांना विनंती करून झालीय त्यांचे थेट कनेक्शन बंद करण्याच्या कारवाईचा इशारा दिला जात आहे.

अशीच कारवाई सध्या नाशिक शहरातही सुरू आहे. महावितरणचे वसूली पथक थकबाकीदर ग्राहकांच्या घरी जाऊन वसूली करीत आहे. त्यातील एका संतापलेल्या ग्राहकाने थेट महावितरणच्या वसूली पथकावर हल्ला केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number