जय महाराष्ट्र न्यूज, बारामती
बारामतीचे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्यावर 3 अज्ञातांनी चाकूने हल्ला केला आहे.
घराशेजारी बसलेल्या 3 युवकांना काय करता? असे विचारले असता त्या तिघांनी गव्हळेंवर चाकूने हल्ला केला.
गव्हळेंची प्रकृती गंभीर असून बारामती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलीसांचा पुढील तपास सुरु आहे.