जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
काँग्रेस विरुद्ध मनसेतील वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू झालेल्या राडेबाजीने आता उग्ररूप धारण केले आहे.
विक्रोळी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली.
तसेच, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी वांद्रेमधील काँग्रेसच्या कार्यालयावर शाईफेक केली.
तर दुसरीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या निवासस्थानाबाहेर मनसेनं अर्वाच्च भाषेत टीका करणारे पोस्टर्स लावलेयेत.