मनमाडमध्ये भाजप सदस्यावर जीवघेणा हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मनमाड   मनमाडमध्ये मालेगाव पंचायत समितीच्या भाजप सदस्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. लकी खैरनार या भाजप सदस्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलाय. खैरनार हे त्यांच्या गाडीतून प्रवास करत असतांना हल्लेखोरांनी रस्त्यात अडवून त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या दोन गाड्यांचीही तोडफोड केली. यामध्ये खैरनार किरकोळ जखमी झालेत. हल्ल्याचं वृत्त समजताच भाजप नेते अदव्य हिरे […]

मनमाडमध्ये भाजप सदस्यावर जीवघेणा हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मनमाड

 

मनमाडमध्ये मालेगाव पंचायत समितीच्या भाजप सदस्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. लकी खैरनार या भाजप सदस्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलाय.

खैरनार हे त्यांच्या गाडीतून प्रवास करत असतांना हल्लेखोरांनी रस्त्यात अडवून त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या दोन गाड्यांचीही तोडफोड केली.

यामध्ये खैरनार किरकोळ जखमी झालेत. हल्ल्याचं वृत्त समजताच भाजप नेते अदव्य हिरे कार्यत्यांसह घटना स्थळी पोहचले आणि त्यांनी हल्ल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांवर करत त्यांना तातडीने अटक करण्यासाठी धरणे आंदोलन केले.

दरम्यान, भाजप-सेना कार्यकर्ते या अगोदरही एकमेकांना भिडले असून दोन्ही पक्षातील वाद वारंवार चव्हाट्यावर येत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number