सनातन संस्थेचा कथित साधक वैभव राऊतच्या मुसक्या आवळल्यानंतर पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर आणि नालासोपाऱ्यातूनतच शरद कळसकर अशा एकूण तिघांना एटीएसने अटक केली आहे. नालासोपाऱ्यातील भांडारआळी येथून वैभव राऊत यास अटक करण्यात आली आहे.
नालासोपाऱ्यामध्ये वैभव राऊतच्या घरातून एटीएसने मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली आहेत. राऊतच्या घरातून 20 क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आलेत. दोन जिलेटिनच्या कांड्याही जप्त केल्या आहेत. वैभव राऊतने ही स्फोटकं का आणि कशी जमा केली, याचा पोलीस तपास करत आहेत.
#JMBREAKING एटीएसने अवैध बाॅंम्ब प्रकरणी केली तिघांनाअटक, येणाऱ्या सणाच्या दिवसात घातपात करायचा होता कट, ५० बाॅम्ब आढळले… – https://t.co/2fWgZbAtWu — Jai Maharashtra News (@JaiMaharashtraN) August 10, 2018
#JMBREAKING ATS ची कारवाई
बॉम्बप्रकरणी ATS कडून तिघांना अटक
नालासोपाऱ्यातून वैभव राऊत (40) आणि शरद कळसकर (25) यांना अटक
पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर (39) याला अटक
वैभव राऊतच्या घरातून 20 बॉम्ब जप्त
50 बॉम्ब तयार करणाऱ्या 22 वस्तू जप्त – https://t.co/wPOGdtv2zZ pic.twitter.com/RbVlVbfgtk — Jai Maharashtra News (@JaiMaharashtraN) August 10, 2018

