जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
तब्बल 99 जणांना एटीएमच्या माध्यमातून लुटणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला नवघर पोलिसांनी अटक केली आहे. मुलुंडमध्ये या लुटेऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची धरपकड केलीय. यांमध्ये 2 रोमानियन नागरिकांसह 2 भारतीय आरोपींचा समावेश आहे.
मुलुंडमधील कोटक बँकेच्या एटीएममधून ज्या नागरिकांनी पैसे काढले होते. अशा तब्बल 99 जणांचे एटीएम क्लोन करून तसेच, स्पाय कॅमेऱ्याद्वारे त्यांचा पासवर्ड मिळवून या टोळीने त्यांच्या अकाऊंटमधून पैसे काढले होते. अखेर मुलुंड पोलिसांनी सापळा रजून या लुटेऱ्यांच्या मुसक्या आवळल्या.