पालघर जिल्ह्यातील केळवे पूर्व भागातील देवीपाडा येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने एका कुटुंबावर अत्यंत हृदयद्रावक प्रसंग ओढवला . पालघरमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या पूर परिस्थितीत मृतदेह छतावर घेऊन बसण्याची वेळ कुटुंबावर ओढवल्याचे पाहायला मिळत आहे. पालघरच्या केळवे पूर्वेस असलेल्या देवीपाडा येथील घटना समोर आली आहे. अनुसया मनोहर लीलका या 55 वर्षीय महिलेचा मृतदेह घेऊन कुटुंब छतावर बसलं होतं. घराच्या चारही बाजूंनी पाणी भरल्याने मृतदेह छतावर नेण्याची कुटुंबीयांवर वेळ आली.
दरम्यान पालघरमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात एक कुटुंब लहान चिमुकल्यांसह आठ जण तब्बल चार तास घराच्या छतावर अडकून पडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पालघरच्या केळवे परिसरातील देवीपाडा येथील हा व्हिडिओ असून घराला चारही बाजूने पाण्याने वेढा घातल्याने या कुटुंबाने घराच्या छताचा भर पावसात आसरा घेतला.
यामध्ये काही चिमुकली मुल देखील घरावर अडकून पडली असून चार तास कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. दरम्यान चार तासानंतर परिसरातील पाणी ओसरल्यानंतर हे कुटुंब आपल्या चिमुकल्यांसह छतावरून खाली आलं. पालघरच्या केळवे परिसरातील धक्कादायक प्रकार समोर आली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील आपत्कालीन सुविधा, पूरनियोजन आणि बचाव यंत्रणेच्या उपलब्धतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.