Viral Video : अवघ्या 3 सेकंदात अक्षरशः यमदूत दिसला, टीसी अगदी देवासारखा धावून आला, स्थानकावरचा Video व्हायरल

रेल्वेत प्रवास करताना सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. तरीसुद्धा काही प्रवाशी जिवाची पर्वा न करता धाडस करतात. असाच प्रकार नुकताच मुंबईतील बोरिवली रेल्वे स्टेशनवर घडला.

Viral Video : अवघ्या 3 सेकंदात अक्षरशः यमदूत दिसला, टीसी अगदी देवासारखा धावून आला, स्थानकावरचा Video व्हायरल

रेल्वेत प्रवास करताना सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. तरीसुद्धा काही प्रवाशी जिवाची पर्वा न करता धाडस करतात. असाच प्रकार नुकताच मुंबईतील बोरिवली रेल्वे स्टेशनवर घडला. धावत्या रेल्वेतून उतरायचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाचा तोल बिघडला आणि तो खाली पडला. परंतु त्या वेळेस स्थानकावर उभ्या असलेल्या एक तिकीट निरीक्षकाने (टीसी) वेळेत हस्तक्षेप करून त्याचे प्राण वाचवले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेही वाचा- AI नव्हे, सत्य! Annamalai Tiger Reserve मध्ये निसर्गाची अनोखी मैफल; रंगीबेरंगी पक्ष्यांचा किलबिलाट झाला व्हायरल
सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ही घटना 22 मार्च 2026 ची असून मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. ज्यात एक प्रवासी खांद्याला बॅग अडकवून हातात सुटकेस घेऊन युव्हा एक्सप्रेस बोरिवली स्थानकावर थांबण्याआधीच धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस तो तोल जाऊन प्लॅटफॉर्मवरून फरपटत जात होता ज्यामुळे तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधोमध अडकण्याची शक्यता निर्माण झाली होती.

मात्र बोरिवली स्थानकावर उभा असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला. प्रवाशाला खाली पडलेलं पाहताच प्लॅटफॉर्मवर असलेला तिकीट निरीक्षक धावत त्याला वाचवण्यासाठी गेला आणि प्रवाशाला पकडून सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवर ओढून घेतलं. त्या तिकीट निरीक्षकाच्या या धाडसाने स्थानकावर उपस्थित प्रवाशांनीही कौतुक केलं आहे. रेल्वे प्रशासनाने देखील या घटनेची नोंद घेत कर्मचाऱ्याच्या सतर्कतेचं कौतुक केलं आहे. तसेच प्रवाशांना सतर्क राहण्याचे महत्त्व आणि आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number