मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकच्या वेळी ही घटना घडली आहे. देशपांडे यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळताना जे […]

मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकच्या वेळी ही घटना घडली आहे. देशपांडे यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे सध्या सुखरुप आहेत. त्यांना थोडा मार लागला आहे. त्यांनी उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाजी पार्क पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

या घटनेमुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हा नियोजीत हल्ला असल्याचा मनसेने आरोप केला आहे. देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला राजकीय हल्ला असण्याची शक्यता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number