साखळी गटात अपराजीत राहिलेला भारतीय संघाचा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर गटातल्या बांग्लादेशसोबत चांगलाच सामना रंगला.
बांग्लादेशने विजयासाठी ठेवलेल्या 174 धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने झळकावलेल्या सलग दुस-या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला.
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवल्यानंतर भारत अंतिम फेरीत आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी मैदानात उतरला होता.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघांने हार्दिक पंड्याच्या जागी रवींद्र जडेजाला संधी दिली आहे.