अश्विनीचा पेशवाई लूक

मुंबई, २५ एप्रिल २०२३, प्रतिनिधी :छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील घराघरात पोहचलेली अभिनेत्री अश्विनी महंगडे समाज माध्यमांवर नेहमीच सक्रीय असते. अश्विनी मालिकेत अनघाचं पात्र साकारत आहे. अश्विनीने अभिनयातून सर्व प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. तर अश्विनी समाज माध्यमांवर अनेकदा विविध वेशभुषात फोटो आणि व्हिडिओज सामायिक करत असते.अश्विनीने नुकतेच पारंपरिक पेशवाईत फोटो सामायिक केले […]

अश्विनीचा पेशवाई लूक

मुंबई, २५ एप्रिल २०२३, प्रतिनिधी :छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील घराघरात पोहचलेली अभिनेत्री अश्विनी महंगडे समाज माध्यमांवर नेहमीच सक्रीय असते. अश्विनी मालिकेत अनघाचं पात्र साकारत आहे. अश्विनीने अभिनयातून सर्व प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. तर अश्विनी समाज माध्यमांवर अनेकदा विविध वेशभुषात फोटो आणि व्हिडिओज सामायिक करत असते.अश्विनीने नुकतेच पारंपरिक पेशवाईत फोटो सामायिक केले आहेत. अश्विनीने लाल काठ पदर असलेली गडद निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.

तर त्यावर जुने पारंपरिक सोनेरी रंगाचे दागिने घातले आहेत. दुसऱ्या पारंपरिक वेशभुषेतील फोटोमध्ये अश्विनीने लाल रंगाची नऊवारी साडी आणि त्यावर मोत्याचे दागिने घातले आहेत. कानातील कर्णफुल दागिन्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून अश्विनीच्या मराठमोळा साजने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.अश्विनीच्या या फोटो चाहत्यांचा चांगलेच पसंतीस उतरले आहेत. तसेच श्रीमंत पेशवीन बाई असं म्हणत तीचं कौतुक केलं आहे. अश्विनी अनेकदा पारंपरिक वेशभूषेतील फोटो सामायिक करत असते. दरम्यान, सध्या तीचा पारंपारिक पेशवाई लूक समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number