अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी नेव्ही टीमकडून शोध मोहिम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बेपत्ता एपीआय अश्विनी बिद्रे प्रकरणाची उकल आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सोमवारी नवी मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकाने भाईंदरजवळच्या वसई खाडीत ब्रिदेंच्या मृतदेहाचा शोध सुरु केला आहे. याकामासाठी क्राईम ब्रांचने नौदल, तटरक्षक दल, स्थानिक मच्छिमार आणि अग्निशमन विभागाचीही मदत घेतली आहे. मात्र, अजून कोणताही धागादोरा तपास यंत्रणांना मिळालेला नाही. नवी मुंबई क्राईम […]

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी नेव्ही टीमकडून शोध मोहिम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बेपत्ता एपीआय अश्विनी बिद्रे प्रकरणाची उकल आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सोमवारी नवी मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकाने भाईंदरजवळच्या वसई खाडीत ब्रिदेंच्या मृतदेहाचा शोध सुरु केला आहे. याकामासाठी क्राईम ब्रांचने नौदल, तटरक्षक दल, स्थानिक मच्छिमार आणि अग्निशमन विभागाचीही मदत घेतली आहे. मात्र, अजून कोणताही धागादोरा तपास यंत्रणांना मिळालेला नाही.

नवी मुंबई क्राईम ब्रांचने चौथा आरोपी महेश पळणीकराला अटक केल्यानंतर अनेक महत्तवपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. बिद्रे यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्रिदे यांचे धड लोखंडी पेटीत टाकून ते वसईच्या खाडीत फेकल्याची माहिती ही पोलिसांना मिळाली. त्यामुळे सोमवारी दिवसभर संपूर्ण खाडी परिसरात सर्चिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. यावेळी आरोपी महेश पळणीकरलाही घटनास्थळी आणण्यात आलं होतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number