आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी कलश घेऊन शेतकरी संघटना मंत्रालयात धडकणार

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   राज्यात शेतकरी आत्महत्येचा मोठा प्रश्न भेडसावत असूनही सरकारकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.   कृषीप्रधान देश असूनही राज्यातील बळीराजा पोरका झाला. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.   सरकारला जाग आणण्यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थिकलश दर्शनयात्रा घेऊन मंत्रालयावर धडक मारण्यासाठी शेतकरी संघटनेचे विजय […]

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी कलश घेऊन शेतकरी संघटना मंत्रालयात धडकणार

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

राज्यात शेतकरी आत्महत्येचा मोठा प्रश्न भेडसावत असूनही सरकारकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.

 

कृषीप्रधान देश असूनही राज्यातील बळीराजा पोरका झाला. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

 

सरकारला जाग आणण्यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थिकलश दर्शनयात्रा घेऊन मंत्रालयावर धडक मारण्यासाठी शेतकरी संघटनेचे विजय जाधव यांनी नाशकातील शेतकऱ्यांचा अस्थि जमा केल्या आहेत.

 

या यात्रेची दखल सरकारने घेतली नाही तर महाराष्ट्रातील ‘भोगी सरकार’ विरोधात उत्तर प्रदेशच्या ‘योगी सरकार’कडे दाद मागण्यासाठी तिथेपर्यंत यात्रा करण्याचा निर्धार जाधव यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number