‘दारू पिऊन शिक्षक मारतात!’ आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

पिंपळे येथील सु. आ. पाटील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी पायी मोर्चा काढला. पिंपळे येथील आदिवासी आश्रम शाळेतील सुमारे 150 ते 200 विध्यार्थ्यांनी मोर्चाला सुरूवात केली. शिक्षक रात्री शाळेत दारू पितात, दारू पिऊन विद्यार्थ्यांना खोलीत बंद करून अमानुष पणे मारहाण करतात. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे […]

‘दारू पिऊन शिक्षक मारतात!’ आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

पिंपळे येथील सु. आ. पाटील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी पायी मोर्चा काढला. पिंपळे येथील आदिवासी आश्रम शाळेतील सुमारे 150 ते 200 विध्यार्थ्यांनी मोर्चाला सुरूवात केली.

शिक्षक रात्री शाळेत दारू पितात, दारू पिऊन विद्यार्थ्यांना खोलीत बंद करून अमानुष पणे मारहाण करतात. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण देतात, जेवणात आळ्या, किडे निघत असतात तसेज रात्री 1 वाजता राकेश पावरा आणि दिलीप पावरा यांना भूषण पाटील सर, नितीन पाटील सर, अंबालाल पाटिल सर उदय पाटील सर रवी पाटील कामाटी यांना रात्री मारले अशा अनेक तक्रारी करत थेट यावल येथील प्रकल्प अधिकारी कार्यालय निघाले.

या मोर्चात शिक्षकाच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. तसंच आदिवासी पारधी महासंघाच्या महिला प्रदेशध्यक्षा- जयश्री साळुंके यांनी पाठिंबा दिला. मुलांसोबत त्याही पायी मोर्चात सहभागी झाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number