Dattatray Bharne : आमची लग्न जुळेना, पाऊस पडेना, कोणी मुलगी देईन…; बीडच्या तरुण शेतकऱ्याने मांडणी कृषीमंत्र्यांसमोर व्यथा

बीड : शेतीतील अनिश्चित उत्पन्न, दुष्काळ, वाढते कर्ज आणि आर्थिक अस्थिरता यामुळे अनेक पालक शेतकऱ्यांना मुली देणं टाळत असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे. याच सामाजिक आणि आर्थिक चिंतेतून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अशोक माने या तरुण शेतकऱ्याने थेट शेताच्या बांधावरून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून आपल्या व्यथा मांडल्या. सलग तीन दिवस प्रयत्न केल्यानंतर […]

Dattatray Bharne :  आमची लग्न जुळेना, पाऊस पडेना, कोणी मुलगी देईन…; बीडच्या तरुण शेतकऱ्याने मांडणी कृषीमंत्र्यांसमोर व्यथा

बीड : शेतीतील अनिश्चित उत्पन्न, दुष्काळ, वाढते कर्ज आणि आर्थिक अस्थिरता यामुळे अनेक पालक शेतकऱ्यांना मुली देणं टाळत असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे. याच सामाजिक आणि आर्थिक चिंतेतून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अशोक माने या तरुण शेतकऱ्याने थेट शेताच्या बांधावरून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून आपल्या व्यथा मांडल्या. सलग तीन दिवस प्रयत्न केल्यानंतर रविवारी अखेर अशोक माने यांचा कृषिमंत्र्यांशी संपर्क झाला. यावेळी त्यांनी आष्टी परिसरातील दुष्काळी परिस्थिती, शेतीचे झालेले नुकसान आणि त्याचे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर होत असलेले गंभीर परिणाम मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा : Tukaram Mundhe: भेसळीनंतर आता FDA ची नजर शाळेच्या कँटिनवर, विद्यार्थ्यांच्या आहाराची होणार तपासणी

यावेळी अशोक माने म्हणाले की, यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, हा प्रश्न केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचे सामाजिक परिणामही आता प्रकर्षाने जाणवत आहेत. पाऊस नाही, पिकं नाहीत. त्यामुळे मुलांची लग्नंदेखील जमत नाहीत. शेतीची परिस्थिती पाहून मुलींची कुटुंबेही मागे हटतात. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अटी-शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी,” अशी मागणी अशोक माने यांनी दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.

 

या तरूणाशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, “राज्यात सुमारे 40 हजार कोटी रुपयांची मोठी कर्जमाफी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही निवडणूक समोर नसताना हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत या कर्जमाफीमुळे सर्वच शेतकऱ्यांचे समाधान होईल, असे नाही. शेतकरी आजही अडचणीत आहेत. मी स्वतःही शेतकरी असल्याने त्यांची वेदना समजू शकतो,” असेही भरणे यावेळी म्हणाले. दरम्यान, अशोक माने आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यातील हा संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number