Ashok Kharat Case : अशोक खरातचा आणखी एक कारनामा; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवली, अवतारपूजा अन् सीएलाच लावला 8 कोटींचा चुना

नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात मध्यरात्री खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ashok Kharat Case : अशोक खरातचा आणखी एक कारनामा; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवली, अवतारपूजा अन् सीएलाच लावला 8 कोटींचा चुना

भोंदू अशोक खरात प्रकरणाबाबत अनेक मोठ्या अपडेट्स समोर येत आहेत. आता खरात मोठ्या अडचणीत सापडला आहे. चार्टर्ड अकाउंटंट ललित पोफळे यांची तब्बल 8 कोटी 76 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात मध्यरात्री खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ललित पोफळे हे अशोक खरात याच्या ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत होते.आई-वडिलांच्या मृत्यूचा योग असल्याचे सांगून भीती घातली. हा मृत्यूचा योग टाळण्यासाठी आणि ‘अवतारपूजा’ करण्याच्या बहाण्याने खरातने पोफळे यांच्याकडून वेळोवेळी कोट्यवधी रुपये उकळले.

पोफळे हे खरातच्या ट्रस्टचे महत्त्वाचे घटक असल्याने, या नव्या गुन्ह्यामुळे खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number