Ashok Kharat Case: ‘बाहेर पडणं कठीण झालंय…’; खरात प्रकरणातील पीडित महिलांची मानसोपचार तज्ज्ञांकडे आर्त हाक, समाजात वावरण्याची वाटतेय भीती

एसआयटीमार्फत तपास सुरू असून पोलिसांनी अशा व्हिडिओंचे शेअरिंग केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Ashok Kharat Case: ‘बाहेर पडणं कठीण झालंय…’; खरात प्रकरणातील पीडित महिलांची मानसोपचार तज्ज्ञांकडे आर्त हाक, समाजात वावरण्याची वाटतेय भीती

नाशिक: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण अधिक गंभीर होत चालले असून चौकशीतून दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांशी अश्लील वर्तन केल्याचे आरोप आणि त्यासंबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. सध्या खरात पोलीस कोठडीत असून त्याची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे.

पीडित महिलांवर मानसिक आघात

या प्रकरणातील पीडित महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अनेक महिला नैराश्याच्या छायेखाली गेल्या असून त्या घरातच एकाकी पडल्या आहेत. पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली आहे. “बाहेर पडणे कठीण झाले आहे, लोक चौकशी करतात, समाजात वावरताना भीती वाटते,” अशी खंत त्यांनी व्यक्त केल्याचे समजते.

हेही वाचा: Ashok Kharat Case : आधी खरातकडून फसवणूक नंतर व्हायरल व्हिडिओमुळे पीडित महिलांचं जीणं मुश्कील, आता त्या महिला कोणत्या अवस्थेत?

व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे

या संदर्भात जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत 150 पेक्षा अधिक गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलांनी स्वतः पुढे येऊन तक्रारी दाखल केल्या असून एसआयटीमार्फतही कारवाई सुरू आहे.

गोपनीय चौकशी सुरू

तपास यंत्रणांकडून पीडित महिलांची गोपनीय पद्धतीने चौकशी केली जात आहे. त्यांच्यावर अधिक ताण येऊ नये यासाठी काळजी घेतली जात असल्याची माहिती आहे.

पोलिसांचा इशारा

दरम्यान, पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, या प्रकरणातील व्हिडिओ पुढे शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. एकूणच, अशोक खरात प्रकरण आता केवळ गुन्हेगारीपुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि मानसिक पातळीवरही गंभीर परिणाम घडवत आहे. पुढील तपासात आणखी कोणते खुलासे होतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा: Ownership Right: सरकारी जागेवर राहणाऱ्यांची चिंता मिटली; तुमच्या घरावर आता शासनाची अधिकृत मोहोर, काय आहे शासन निर्णय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number