जय महारााष्ट्र न्यूज, मुंबई
भिमा कोरेगाव प्रकरण हे सरकारचं अपयश असुन मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केलीये.
गेल्या तीन वर्षांपासून राज्यात जातीय तणाव निर्माण झालाय. सरकार त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करित आहे.
जातीय तणाव निर्माण करणा-यांवर सरकार कारवाई का करित नाही? असा सवाल अशोक चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.