आशिष शेलारांच्या लढ्याला यश; मुंबईतील 5 हजार सोसायट्यांना होणार फायदा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ओसी नसल्यामुळे डिम कन्व्हेअन्सकरता रखडलेल्या सोसायट्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.   मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांची भेट घेत डिम कन्वेअन्सकरता लागणारी ओसीची अट रद्द करण्याची मागणी केली होती.   अखेरीस त्यांची ही मागणी सरकारने मान्य करत ओसीची अट रद्द करण्याचं मान्य केलं आहे. […]

आशिष शेलारांच्या लढ्याला यश; मुंबईतील 5 हजार सोसायट्यांना होणार फायदा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ओसी नसल्यामुळे डिम कन्व्हेअन्सकरता रखडलेल्या सोसायट्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांची भेट घेत डिम कन्वेअन्सकरता लागणारी ओसीची अट रद्द

करण्याची मागणी केली होती.

 

अखेरीस त्यांची ही मागणी सरकारने मान्य करत ओसीची अट रद्द करण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे मुंबईतील सुमार 5 हजार इमारतींना डिम कन्वेअन्सकरता फायदा

होणार आहे.

 

गृह निर्माण सोसायटींना विकासकाकडून जागेची मालकी देण्यात विलंब होत होता. त्यावर उतारा म्हणून आणलेल्या डिम कन्व्हेअन्स योजनेत जाचक अटी घालण्यात

आल्या होत्या.

 

विशेषत: गृहनिर्माण संस्थांना ओसी देण्याची अट घालण्यात आली होती. बिल्डर निघुन गेल्याने ओसीअभावी 5 हजार सोसायट्यांचे डिम कन्व्हेअन्स रखडले होते.

 

मात्र, सरकारच्या या नव्या निर्णयामुळे 5 हजार सोसायटीतील रहिवाशांची अडचणीतून सुटका झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number