मुंबई, २७ मे २०२३, प्रतिनिधी : हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी नुकतेच दुसरे लग्न केले आहे. वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केल्याने समाज माध्यमांवर बऱ्याच चर्चा होऊ लागल्यात. अशातच त्याच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असताना दुसरीकडे मात्र त्यांची पहिली पत्नी म्हणजेच पीलू विद्यार्थीने समाज माध्यमांवर एक भावनिक पोस्ट सामायिक केली आहे. यामुळे आणखी चर्चा रंगू लागल्या आहेत,.
आशिष विद्यार्थी यांनी ननुक्तेच दुसरे लग्न केले. त्यानंतर आता त्यांची पहिली पत्नी पीलू विद्यार्थीने समाज माध्यमांच्या माध्यमातून आपले दुःख व्यक्त केले आहे . तिने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात तिने लिहिलं, “एखाद्या गोष्टीचा खूप विचार केल्याने गोंधळून जायला होतं. आता सगळं संपलं आहे, असं वाटतं. पण आता आयुष्यात शांती येऊ देत. तुम्हालाही आशीर्वाद मिळावा कारण तुम्ही त्यासाठी पात्र आहात.” तिच्या या पोस्टमुळे आता नव्या चर्चांना उधाण आले आहे.