दहिहंडी उत्सवाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ‘त्या’ निर्देशांचे आशिष शेलारांकडून स्वागत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   दहिहंडी उत्सवाबाबत संभ्रमाचे वातावरण असताना सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचे निर्देश दिलेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी याचे स्वागत केले.   या निर्देशांमुळे नव्या निर्णयाचे दरवाजे खुले होतील. अशी प्रतिक्रिया देखील आशिष शेलारांनी दिली. तसेच दहिहंडीबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन सर्वोच्च न्यायालयात नव्यानं प्रतिज्ञापत्र सादर केले.   तसेच तुषार मेहता यांना […]

दहिहंडी उत्सवाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ‘त्या’ निर्देशांचे आशिष शेलारांकडून स्वागत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दहिहंडी उत्सवाबाबत संभ्रमाचे वातावरण असताना सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचे निर्देश दिलेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी याचे स्वागत केले.

 

या निर्देशांमुळे नव्या निर्णयाचे दरवाजे खुले होतील. अशी प्रतिक्रिया देखील आशिष शेलारांनी दिली. तसेच दहिहंडीबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन सर्वोच्च

न्यायालयात नव्यानं प्रतिज्ञापत्र सादर केले.

 

तसेच तुषार मेहता यांना विशेष काऊंसिल म्हणून नियुक्त केलं असल्याची माहिती आशिष शेलारांनी दिली. तर, राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायालयाच्या

निर्देशांचे पालन करण्याविषयी म्हणणे मांडले.

 

त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा विषय फेरविचारासाठी हायकोर्टाकडे पाठवत असल्याचे आजच्या सुनावणीनंतर सांगितले. त्यामुळे 7 ऑगस्टला हायकोर्टात सुनावणी

होणार आहे.

 

दरम्यान दहीहंडीची उंची कमी केल्यास या साहसी खेळाचा आनंद कमी होतो असा दावा दहिहंडी उत्सव मंडळांनी याचिकेत केला.

 

10 जुलैला सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दहीहंडी खेळताना घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती देण्याचे निर्देशे दिले होते.  दहीहंडी खेळताना

सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेत असल्याने गोविंदांचं वयाचं बंधन शिथील करावं असं राज्य सरकारने न्यायालायत सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number