Asha Bhosle Late Rites : …आणि शेवटी त्यांनी रडवलंच; गानसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आशाताईंवर अंत्यसंस्कार केले गेले. 

Asha Bhosle Late Rites : …आणि शेवटी त्यांनी रडवलंच;  गानसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

आशा भोसले यांचे काल म्हणजे १२ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्ष होते.त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मनोरंजन क्षेत्र, राजकीय क्षेत्र, क्रीडा क्षेत्रामधून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आशाताईंवर अंत्यसंस्कार केले गेले. 

आशाताईंवर शिवाजी पार्क येथे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. त्यांना मुंबई पोलिसांकडून सलामी देण्यात आली. त्यांच्या जाण्याने सर्वांचेच डोळे पाणावले होते.  आशा भोसले यांच्या निधनाची बातमी येताच काल फक्त महाराष्ट्र किंवा भारत नव्हे तर त्यांच्या सुरांनी मंत्रमुग्ध झालेले, जगभरात पसरलेले त्यांचे कोट्यवधी चाहते हळहळले,  शोकाकूल झाले. अनेक राजकारणी, प्रसिद्ध व्यक्तीमत्वं, गायक, संगीतकार, सेलिब्रिटींनी विविध पोस्टद्वारे सुरांच्या या सम्राज्ञीला मानवंदना देत श्रद्धांजली वाहिली.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number