Asha Bhosle: निधनाच्या काही दिवसांपूर्वीच आशा भोसले यांनी दत्त महाराजांवरील गायल गाणं; भावस्पर्शी संगीताने अनेकजण भावूक

त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांसारख्या सर्वोच्च सन्मानांनी गौरवलं.

Asha Bhosle: निधनाच्या काही दिवसांपूर्वीच आशा भोसले यांनी दत्त महाराजांवरील गायल गाणं; भावस्पर्शी संगीताने अनेकजण भावूक

मुंबई: संगीताच्या आकाशातला एक तेजस्वी तारा आज कायमचा मावळला पण त्याचा प्रकाश कधीच कमी होणार नाही. भारतीय सिनेमाच्या स्वरसंपदेची अमर प्रतिमा ठरलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे प्रकृती खालावल्याने उपचारादरम्यान आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती नाही, तर एक संपूर्ण संगीतयुगच संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांसारख्या सर्वोच्च सन्मानांनी गौरवलं. याशिवाय राष्ट्रपती पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी त्यांची कारकीर्द अधिकच उजळून निघाली. आशाताईंनी केवळ गाणी गायली नाहीत, तर प्रत्येक गीताला आत्मा दिला आणि म्हणूनच त्यांची गाणी आजही तितकीच ताजी आणि भावस्पर्शी वाटतात.

हेही वाचा: Asha Bhosle: ‘आयुष्याने अनेक घाव घातले, पण संगीताने सावरलं’; आशा ताईंनी सांगितला होता संघर्षाचा प्रवास

त्यांच्या निधनानंतर देशभरातून श्रद्धांजलींचा ओघ सुरू झाला आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सोशल मीडियावरून दुःख व्यक्त केलं आहे. विशेषतः आशीष शेलार यांनी काही दिवसांपूर्वीचा त्यांचा एक भावपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आशाताई ‘मला हे दत्त गुरु दिसले…’ या ओळींनी सुरुवात करत ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं स्मरण करत गाताना दिसतात. त्यांचा स्वर आजही तितकाच मंत्रमुग्ध करणारा आहे.

या व्हिडिओसोबत आशिष शेलार यांनी लिहिलेलं वाक्य अनेकांच्या मनाला भिडणारं ठरलं. त्यांनी लिहले आहे, “भोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या… जय शारदे.. वागेश्वरी ची प्रार्थना गाणाऱ्या… कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपट गीत ही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या… भाषेची बंधने तोडून 20 पेक्षा जास्त भाषेत गाणाऱ्या… स्वतःच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला लिलया हरवणाऱ्या… आणि भाऊबीजेला “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती…” अशी अजरामर ओवाळणी गाणाऱ्या आशाताई गेल्या. माझ्यासाठी तर माझी प्रिय बहिण मी आज गमावली… साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकार आज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही…माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली… त्यांच्या असंख्य भेटी माझ्या हृदयात साठवलेल्या आहेत… काही दिवसांपूर्वीची ही एक संस्मरणीय भेट !

आज आशा भोसले यांचा देह नश्वर झाला असला, तरी त्यांचे सूर अजूनही मनात दरवळत आहेत. त्यांच्या आवाजाने अनेक पिढ्यांना प्रेम, वेदना आणि आनंदाची भाषा शिकवली. “सूर अमर असतात,” ही जाणीव पुन्हा एकदा त्यांच्या जाण्याने अधोरेखित झाली आहे. अशा या सुरसम्राज्ञीला अखेरचा सलाम. 

हेही वाचा: Amit Shan On Asha Bhosle Passed Away : ओम शांती शांती शांती… केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडून आशा भोसले यांना भावनिक श्रद्धांजली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number