ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. काल 11 एप्रिल रोजी आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज त्यांचे दु:खद निधन झाले असून उद्या सकाळी 11.00 ते 3.00 दरम्यान अंतिम दर्शनासाठी लोअर परळ येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवलं जाईल. तर उद्या सायंकाळी 4.00 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. दादर शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. आशा भोसले यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.