अजानच्या वादात आशा भोसलेंची उडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   पार्श्वगायक सोनू निगमने प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पीकरच्या वापराविरोधात आवाज उठविल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो चर्चेत आहे. वादात अडकलेल्या सोनू निगमच्या बचावासाठी बॉलीवूडमधील अनेक कलाकार आणि गायक पुढे आले.   आता सोनू निगमच्या समर्थनार्थ सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले मैदानात उतरल्या आहेत. ‘मी सोनूसोबत आहे’, असे सांगत आशा भोसले यांनी सोनूला आपला […]

अजानच्या वादात आशा भोसलेंची उडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पार्श्वगायक सोनू निगमने प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पीकरच्या वापराविरोधात आवाज उठविल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो चर्चेत आहे. वादात अडकलेल्या सोनू निगमच्या बचावासाठी बॉलीवूडमधील अनेक कलाकार आणि गायक पुढे आले.

 

आता सोनू निगमच्या समर्थनार्थ सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले मैदानात उतरल्या आहेत. ‘मी सोनूसोबत आहे’, असे सांगत आशा भोसले यांनी सोनूला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

 

संगीत महोत्सवानिमित्त बनारसमध्ये आलेल्या आशा भोसले यांनी या भेटीत बाबा विश्वनाथ मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतलं. तसेच काशी घाटालाही भेट दिली.

 

काशी घाटावरील स्वच्छता पाहून देशभरातील कामे किती जलद गतीने होत असतील हे लक्षात येते असेही त्या म्हणाल्या. ‘जो नेता देशाला आज मिळाला आहे, तो 50 वर्षांपूर्वी मिळाला असता तर देशाची दिशा आणि दशा दोन्ही बदलेल्या असत्या’ असे कौतुकोद्गारही त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत काढले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number