वृत्तसंस्था, आसाम
आसाम आणि अरुणाचल या राज्यादरम्यान बांधण्यात आलेला ढोला- सादिया पूलाचा आज लोकार्पण सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पूलाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
या पूलाची लांबी 9.15 किलो मीटर असून देशातला सर्वात लांब पूल अशी या पूलाची ओळख आहे. लोहित नदीवर बांधण्यात येणाऱ्या या पुलामुळे आसाम आणि अरुणाचलमधील दळणवळ अधिक सुखकर होणार आहे.
2010 मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. ढोला- सादिया पूलासाठी तब्बल 2096 कोटींचा खर्च आला.