वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी बोलणाऱ्यांना 3 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सराकारने सुनवावी अशी मागणी एमआयएमचे खासदार असदद्दुदिन ओवेसींनी केली.
बुधवारी लोकसभेत बोलताना केंद्रसरकारने या संदर्भात विशेष कायदा बनवावा असं बोलत त्यांनी आपल मतं मांडल. काश्मीर आणि हरियाणात झालेल्या काही घटनांवर बोलतांना त्यांनी राज्य सरकारला जबाबदार ठरवले. याशिवाय केंद्र सरकार लोकांना सुरक्षा देण्याऐवजी लोकांच्या विचारधारेवर काम करत आहे, असही ते यावेळी म्हणाले.
लोकसभेत बोलत असतांना ‘अजूनही 70 वर्षानंतर मला पाकिस्तानी म्हणून बोलावलं जात. का? मी पाकीस्तानला झिडकारलं. आणि आता सुद्धा मी भारताचा तिरंगासुद्धा फिरकावू शकत नाही, कारण याला जबाबदार ते म्हणजे हे असे लोक जे अजूनही भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी बोलतात, हिनवतात. मी हक्काने विचारतो की काय तुम्ही एस.सी., एन.टी., साठी जो कायदा बनवला गेला तसा आमच्यासाठी ही का नाही बनवतं. या विषयावर बोलताना ओवेसींनी सलमान खानला पुढे करत आपल्या विषयावर बोलत ते होते. भारतीयांच्या बोलण्यावरून आम्ही जीनादचा पैगाम देखील ठुकरावला तरीही आम्हांला पाकिस्तानी म्हणून हिनवतात’ असं ओवेसींनी या विषयावर आपलं मत मांडल.