बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मध्ये एका एटीएम मशीन मधून पैसे बाहेर येत नसल्याने संतापून एकाने एटीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मलकापूर शहरातील एसबीआय बँकेच्या एटीएम मशीन मधून अनेक वेळा प्रयत्न करून देखील पैसे निघत नसल्याने या माथेफिरूने बाहेरून दगड आणून एटीएम मशीनची स्क्रीन फोडली आहे. मलकापूर पोलिसात या माथेफिरू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एटीएम रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने ही एटीएम मशीन नेमकी कोणी फोडली त्याचा पत्ता मात्र लागलेला नाही.. मलकापूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.