Vasai Crime News : ‘त्या’ चार वर्षीय निरागस बालकाच्या उपचारासाठी आर्थिक मदत मंजूर; मुख्यमंत्र्यांनी दिल्या तातडीने सहाय्यतेच्या सूचना

मुंबई : काही दिवसांपूर्वी वसई परिसरात एका चार वर्षीय बालकाला अमानुषपणे मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. एका निष्पाप चिमुकल्यावर रिक्षाचालकाने केलेल्या अमानुष अत्याचारामुळे संतापाची लाट उसळली होती. तसेच या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. दरम्यान, त्या चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्री […]

Vasai Crime News : ‘त्या’ चार वर्षीय निरागस बालकाच्या उपचारासाठी आर्थिक मदत मंजूर; मुख्यमंत्र्यांनी दिल्या तातडीने सहाय्यतेच्या सूचना

मुंबई : काही दिवसांपूर्वी वसई परिसरात एका चार वर्षीय बालकाला अमानुषपणे मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. एका निष्पाप चिमुकल्यावर रिक्षाचालकाने केलेल्या अमानुष अत्याचारामुळे संतापाची लाट उसळली होती. तसेच या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. दरम्यान, त्या चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्याला तातडीची मदत मिळावी, यासाठी सूचना दिल्या आहेत. 

काय आहे घटना

वसई पश्चिम भागातील एका निवासी संकुलात ही घटना घडली होती. रात्रीच्या सुमारास परिसरात खेळत असलेल्या चार वर्षाच्या मुलाला एका रिक्षाचालकाने लक्ष्य केले. अचानक त्याने मुलाला उचलून घेतले आणि संतापाच्या भरात त्याच्यावर हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आरोपीने मुलाला पायाला पकडून फिरवत जमिनीवर आपटले. या घटनेमुळे परिसरात उपस्थित लोकंही हादरले. त्या मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सोसायटीतील आपापसातील भांडणातून हे कृत्य केल्याने उघडकीस आहे. त्या रिक्षाचालकाला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. मात्र चिमुकल्यावर झालेल्या मारहाणीने संपूर्ण शहर हादरून गेले. 

हेही वाचा : Dhurandhar 2: दाऊद इब्राहिम समजून व्हायरल झालेला फोटो निघाला फेक; फोटोतील व्यक्ती कोण? धक्कादायक सत्य समोर

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मंजूर

वसई पश्चिम येथील चार वर्षीय निरागस बालकाला मारहाण झाली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या विघ्नेशच्या उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. सध्या या चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याचे पालकांनी सांगितले.

३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सोसायटीच्या आवारात मित्रांसोबत खेळत असलेल्या विघ्नेश अतुल कोंढारे (वय ४) या बालकाला मारहाण झाली. या मारहाणीत विघ्नेशच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.

या घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत विशेष बाब म्हणून मदत करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या सूचनांनुसार संबंधित रुग्णास तत्काळ आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

सध्या विघ्नेशवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली मोफत उपचार सुरू आहेत. या मदतीबद्दल विघ्नेशचे वडील अतुल कोंढारे म्हणाले, “मुख्यमंत्री सहाय्यता निधीने केलेल्या मदतीबद्दल आम्ही अतिशय कृतज्ञ आहोत. या सहाय्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे आणि आता विघ्नेशची प्रकृती स्थिर आहे.”

गरजू रुग्णांनी वैद्यकीय आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number