आर्यन खानला उच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने आर्यनचा जामीन मंजूर केला आहे. क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यनच्या जामीनावर न्यायालयात सुनावणी सुरू होती आणि अखेर आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे. आर्यन खानसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. एनसीबीच्या युक्तीवादानंतर अखेर आर्यनच्या जामीनावर न्यायालयाने मंजूरी दिली आहे.
न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला असून मात्र आर्यनला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. आर्यन खानची उद्या किंवा शनिवारी तुरुंगातून सुटका होणार असल्याचे आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांन सांगितले आहे. आर्यन खानच्या जामीनाची सुनावणी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र अखेर आर्यनला एनसीबीच्या युक्तीवादानंतर २५ दिवासांनी जामीनावर सुनावणी झाली आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट, आणि मुनमुन धमेचा यांच्या युक्तीवादाला न्यायालयात बराच वेळ झाला. मात्र आर्यनसह अरबाज आणि मुनमुन यांना दिलासा मिळाला असून त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.