जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एलफिन्स्टन पुलावर झालेल्या अपघाताच्या वेदना ताज्या असतानाच आता धोकादायक पुलाचा दुसरा अध्याय सुरु झालाय. करी रोडचा पूलही अत्यंत धोकादायक आहे.
त्यामुळे करी रोड स्टेशनवरचा प्रस्तावित पूल गोदरेज मैदानात उतरवला तर मी रेल्वे रुळावर झोपेन अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी दिलीय.
महापालिकेनं 4 कोटी रुपये खर्च करून गोदरेज पार्क मैदानाचं सुशोभीकरण केलंय. हा पूल त्या मैदानात उतरला तर तिथं बनवलेली बागही उध्वस्त होईल कितीही किंमत मोजावी लागली तरी शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही असेही सावंत म्हणाले.