अरविंद केजरीवालांच्या सभेला मिळाला हिरवा कंदील

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा बुलडाण्यात होणाऱ्या अरविंद केजरीवालांच्या सभेला आता हिरवा कंदील मिळाला. नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी परवानगी नाकारली होती. महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. याच दृष्टीने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालही 12 जानेवारीला सिंदखेडराजा येथे जाहीर सभेसाठी येणार होते, अशी माहिती आम आदमी पक्षाकडून देण्यात […]

अरविंद केजरीवालांच्या सभेला मिळाला हिरवा कंदील

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

बुलडाण्यात होणाऱ्या अरविंद केजरीवालांच्या सभेला आता हिरवा कंदील मिळाला. नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी परवानगी नाकारली होती. महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. याच दृष्टीने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालही 12 जानेवारीला सिंदखेडराजा येथे जाहीर सभेसाठी येणार होते, अशी माहिती आम आदमी पक्षाकडून देण्यात आली होती.

मात्र, त्यांच्या या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. जिजाऊंचा जन्मोत्सव सिंदखेडराजा येथे 12 जानेवारीला साजरा करण्यात येतो. दरवर्ष5 5 ते 6 लाख लोक या कार्यक्रमाला येत असतात. त्यामुळे अधिक गर्दीच्या कारणावरून पोलिसांनी सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या केजरीवाल यांच्या जाहीर सभेला परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाने हि परवानगी दिली असून आप च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number