जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नागपूरच्या विकासाच्या मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी दोन दिवसासाठी नागपूरला येणार आहेत.
27 आणि 28 जानेवारीला आपल्या दिल्ली सरकारच्या शिष्टमंडळ सोबत नागपूरला येणार व नागपूरच्या विकास मॉडेलमध्ये मेट्रो रेल, रस्ते, पालिकेचे प्रक्रिया केंद्र इत्यादी प्रकल्प समजून घेतील.
या दौऱ्यावर असताना अरविंद केजरीवाल अनेक व्यक्ती आणि अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. तसेच, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट केजरीवाल घेणार असल्याची चर्चा आहे.