एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात उष्णतेचा पार वाढलाय. तापमान वाढीमुळे त्रस्त झालेले नागरिक आपापल्या परीनं काही ना काही उपाय करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आई कुठे काय करते मालिकेतील सर्वांची लाडकी अरुंधती अर्थात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरनं चाहत्यांना सोशल मीडियावर पोस्ट करत एक आवाहन केलं आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका आज घराघरात हमखास पहिली जाते. त्यातही या मालिकेतील अरुंधती ही प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटतेच. अरुंधती अर्थात मधुराणी अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर देखील खूपच सक्रीय असून अलीकडेच तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत उन्हाच्या तडाख्यापासून सर्वांनी सुरक्षित रहावं, असं सांगणारी पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये मधुराणीच्या हातात ताकाचा ग्लास हातात घेतलेला एक फोटो शेअर केला दिसत आहे. हा फोटो तिने, ‘ मित्र मैत्रिणींनो, प्रचंड उन्हाळा आहे…आणि त्यातही घराबाहेर पडून आपली कामं करत राहणे तर भाग आहे. अशावेळी ताक, नारळपाणी ,सरबत पीत राहून आपली काळजी घ्या. तुम्हीही स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घेत रहा’ असे कॅप्शन दिले आहे. मधुराणीनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनीही देखील त्याखाली भरभरून कमेंट केल्या आहेत.