वृत्तसंस्था, नवी मुंबई
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी जेटली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलयं. गेल्या काही दिवसांपासून त्यांना मुत्रपिंडाचा त्रास होत होता. त्यामुळे सोमवारी त्यांना कार्यालयातही जाता आले नव्हतं. त्यांनी स्वत:च याबाबत गुरूवारी ट्विट करून आपण मूत्रपिंड विकाराने त्रस्त असल्याचे सांगितले होते.
अरुण जेटली हे पुढील आठवड्यात दहाव्या भारत-ब्रिटन आर्थिक आणि वित्तीय वार्ता परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला जाणार होते. परंतु, त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यांच्यावर अपोलो रूग्णालयाचे मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. संदीप गुलेरिया हे शस्त्रक्रिया करणार आहेत.