कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

मुंबई ०२ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांनी कर्जतच्या एन डी स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली आहे.आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. देसाई यांच्या आत्महत्येनं मराठी, हिंदी चित्रपट हादरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत […]

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

मुंबई ०२ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांनी कर्जतच्या एन डी स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली आहे.आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. देसाई यांच्या आत्महत्येनं मराठी, हिंदी चित्रपट हादरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती.

प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी आत्महत्या केली. मुंबईतील एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी नितीन देसाई यांच्यावर ५१ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप झाला होता. नितीन देसाई यांनी हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, जोधा अकबर आणि प्रेम रतन धन पायो या चित्रपटांचे सेट डिझाइन केले होते. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

नितीन देसाई हे मराठी चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपटदिग्दर्शक व निर्माते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे. चित्रपटसृष्टीत येण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले होते. १९८७ पासून त्यांची चित्रपट क्षेत्रातील कारकीर्द सुरू झाली. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटामुळे ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यासारख्या सिनेमांचं कला दिग्दर्शन त्यांनी केले होते.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number